मुंबई | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- राज्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सौर ऊर्जा पंपांची मागणी लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले आहेत. महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांनी वीज निर्मिती आणि वीज बचतीचे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवावेत, असेही त्यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर ऊर्जा विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत बोर्डीकर बोलत होत्या. बैठकीस महापारेषणचे कार्यकारी संचालक सतीश चव्हाण, कार्यकारी प्रकल्प संचालक अविनाश निंबाळकर, कार्यकारी संचालक श्रीमती सुचित्रा भिकाने, मुख्य अभियंता पियुष शर्मा, संचालक (वित्त) बाळासाहेब थिटे, संचालक (संचालन) संजय मारुडकर, प्रकल्प संचालक अभय हरणे आणि कार्यकारी संचालक नितीन वाघ उपस्थित होते.
राज्यातील शेती क्षेत्र अधिक सक्षम व्हावे, तसेच शेतकऱ्यांचा वीजेवरील खर्च कमी व्हावा यासाठी सौर ऊर्जा ही उपयुक्त पर्याय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सौर पंपाच्या माध्यमातून मदत करण्यावर भर देण्यात येणार आहे.