जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह :- सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील कोल्हे ( IPS ) यांना राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले…सुनील कोल्हे हे एक आयपीएस अधिकारी होते, त्यांनी सांगलीमध्ये असिस्टंट एस.पी म्हणून काम केले आहे आणि नंतर धुळ्यात एसपी म्हणून काम केले. त्यांनी कोसोवो पीस कॉर्प्सच्या युद्ध गुन्हे युनिटमध्येही काम केले आहे. एटीएसचे ही ते प्रमुख होते.
सुनील कोल्हे 1992 मध्ये पोलिस दलात रुजू झाले.त्यांनी पोलीस दलात संस्मरणीय कामगिरी केली असून या विभागाचे नाव उंचावले आहे..ते मूळचे असोदा येथील आहेत. त्यांचे पोलीस दक्षता लाईव्हच्या संपूर्ण टीम तर्फे खूप खूप अभिनंदन…
से.नि. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील कोल्हे यांना राष्ट्रपती पदक देऊन सन्मान
RELATED ARTICLES