Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeभुसावळप्रा. डॉ. डी. एम. ललवाणी समाज शिरोमणी पुरस्कार 2025 ने सन्मानित

प्रा. डॉ. डी. एम. ललवाणी समाज शिरोमणी पुरस्कार 2025 ने सन्मानित

भुसावळ | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- भुसावळ येथील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य व ललवाणी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा.डाँ. डी. एम. ललवाणी यांना वर्ल्ड सेवन वंडर रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेच्या वतीने 22 व्या अखिल भारतीय प्रतिभा प्रेरणा महासंमेलनात मुंबई येथील भारतरत्न लता मंगेशकर आँडोटोरीयम, मिरा रोड येथे राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार समारंभात समाज शिरोमणी पुरस्कार 2025 हा त्यांनी केलेल्या आतापर्यंतच्या सामाजीक, शैक्षणीक, धार्मिक, सास्क्रुतीक कार्याबद्यल त्याचप्रमाणे अनेक संस्थांना आर्थिक मदत , शैक्षणिक मदत, त्यांनी केली असून अनेक संस्थावर त्यांनी विवीध पदे भूषवली असून त्यांनी आपल्या शिक्षक सेवेत सुध्दा भरीव कार्य केले असुन ते गोसेवा सुद्धा करीत आहे. त्यांच्या अशा या सर्व समावेशक कार्याची दखल घेऊन त्यांना हा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला .

या समारंभात भारतातील महाराष्ट्र , उत्तराखंड, काश्मीर, हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश ,केरळ, छत्तीसगड आदी विविध प्रांतातील पुरस्कार्थी होते. सदरील पुरस्कार सुभेदार श्री कुणाल जी मालुसरे तानाजी मालुसरे यांचे तेरावे वंशज व संस्थापक अध्यक्ष गडदुर्ग संवर्धन ट्रस्ट यांच्या शुभ हस्ते व मिसेस उत्तराखंड डॉ. रूपाली वशिष्ठ डेहराडून, ज्यांच्या नावावर ८८१ पेटंट आहे नेक्स्ट जनरेशन विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर बी के सरकार ,आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य आचार्य प्रणवकुमार शास्री,राष्ट्रपती पदक विजेता आंतराष्ट्रीय सरोदवादक पंडीत ब्रीज नारायण, सहकार महर्षी भगवानराव पाटील लातुर, डाँ.गुरतेज ब्रार कॅनडा, सुरींदर कुमार सोलन हिमाचल, डाँ.पंढरीनाथ रोकडे, डाँ.बा आं.म.विद्यापिठ व संयोजक व फौंडर आरटिबीआर अँड डाँ.क्रांती महाजन यांच्या ऊपस्थीतीत देण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड. क्रांती महाजन यांनी केले . त्यांनी या पुरस्काराचे प्रयोजन, भुमिका विषद करुन हे पुरस्कार्थी हे प्रेरणास्थान असल्याचे नमुद करुन पुरस्कार देतांना अनेक बाबींचा सखोल अभ्यास करुन समिती द्वारा निर्देशीत महानुभावांची निवड केली जाते. प्रा.डाँ.ललवाणी यांच्या सुपुत्राच्या वाढदिवशीच त्यांना गौरविण्यात आल्याने हा दुग्धशर्करा योग झाला.ललवाणी यांनी या पुरस्काराबद्यल क्रुतज्ञता व्यक्त केली असुन त्यांचे सर्व परीवारगण, आप्तेष्ट, मित्रपरीवार, व सर्व स्थरातुन त्यांचे अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या