Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्यापर्यावरण रक्षणासाठी समर्पित कार्याची दखल..! मनोज नाले यांचा "आदर्श पर्यावरण मित्र" पुरस्काराने...

पर्यावरण रक्षणासाठी समर्पित कार्याची दखल..! मनोज नाले यांचा “आदर्श पर्यावरण मित्र” पुरस्काराने गौरव

बुलढाणा |प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- पहाट फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय पर्यावरण संवर्धन परिषद व पुरस्कार वितरण सोहळा नुकताच बुलढाणा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे पार पडला. यावेळी पर्यावरण जनजागृती व संवर्धनासाठी विशेष योगदान दिलेल्या कार्यकर्त्यांना “आदर्श पर्यावरण मित्र” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यात अनेक वर्षांपासून पर्यावरण रक्षणासाठी दिलेल्या योगदानाची पावती म्हणून जळगाव येथील मनोज वासुदेव नाले यांना “आदर्श पर्यावरण मित्र” पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या भव्य सोहळ्याला जिल्हाधिकारी मा. किरण पाटील (प्रशासकीय सेवा), आमदार मा. सिद्धार्थ खरात, मिसेस इंडिया विजेती मा. सौ. रेवता परदेशी, उपविभागीय अधिकारी मा. संजय खडसे, पर्यावरणप्रेमी संत मा. मनजीतसिंह सिंग, आणि मराठी अभिनेत्री मा. केतकी गावले यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमामध्ये पर्यावरण बदल, वृक्षसंवर्धन आणि नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण या विषयांवर विविध सत्रांतून चर्चा झाली. विशेषतः ‘मोगरा फुलला’ या विषयावर मा. सचिन देहरे यांचे विचार प्रेरणादायी ठरले.

या वेळी मनोज वासुदेव नाले यांना “आदर्श पर्यावरण मित्र” पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण रक्षणासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची ही अधिकृत पावती ठरली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या