अमळनेर (पातोंडा) | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:- अमळनेर – पातोंडा शिवारात दिनांक 29 मे रोजी रात्री 08.00 ते 08.30 वाजेचे दरम्यान कैलास शामसिंग प्रजापती वय 45 वर्षे रा. खापरखेडा ता. पिपारिया जि.नर्मदापुरण राज्य मध्य प्रदेश याने पातोंडा ता. अमळनेर येथे वीज लाईन टाकण्याचे काम हाती घेतले होते. सदर कामाकरीता त्याने पिपरिया आणि इतर ठिकाणांहून वीजवाहिनी टाकण्यासाठी मजूर आणले होते व तेथे कामावर ठेवले होते. यातील मयत कैलास शामसिंग प्रजापती व साक्षीदार मजुर हे पातोंडा ता. अमळनेर येथील विकास सहकारी सोसायटीचे जुन गोडावुनमधील दोन खोल्यांमध्ये राहत होते.
त्यावेळी या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी आरोपी क्र.1) सलिम उर्फ संदिप निर्बलशहा धुर्वे, 2) गोपाल शाहुलाल धुर्वे, 3) पंकज उमरावसिंग शीलु, 4) शिवम फुलसिंग शीलु, 5) रोहित बुहुसिंग शीलु सर्व रा. बिजाढना, पो. स्टे इटावा, ता.तामिया जि. छिंदवाडा राज्य मध्यप्रदेश यांनी ठेकेदार मयत कैलास शामसिंग प्रजापती यास आत्ताच आम्हांला ४०,०००/-रुपये दे नाहीतर काही बरे होणार नाही असे बोलले त्यावर कैलास शामसिंग प्रजापती त्यांना म्हणाला की, आता माझ्याकडे पैसे नाहीत, मी सकाळी माझ्या मोबाईलमधून पैसे काढून देतो असे बोलला असता, त्याचा त्यांना राग आल्याने त्यांनी कैलासच्या डोक्यावर हातापायावर, नाकावर आर्थिंगचा पाइप व लोखंडी पहारीने मारहाण केली त्यात कैलास खाली पडला त्याचे डोक्यातुन, नाकातुन, रक्त वाहू लागले. त्यावेळी आरोपींनी कैलासचे हात पाय दोरीने बांधुन ते तेथुन पळुन गेले.
याबाबत बाबत अमळनेर पोलीस स्टेशनला दि. 03 जून रोजी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील जखमी याचेवर इंदौर मध्य प्रदेश येथील खाजगी रूग्णालयात औषधोचपार चालु असतांना त्यांचा मृत्यु झाला होता. या गुन्ह्यात कलम 103 हे वाढील कलम लावण्यात आले. सदर गुन्ह्यातील आरोपी सलिम उर्फ संदिप निर्बलशहा धुर्वे वय (22), गोपाल शाहुलाल धुर्वे वय (35), पंकज उमरावसिंग शीलु, वय (27), शिवम फुलसिंग शीलु वय (18), रोहित बुदुसिंग शीलु वय (19) सर्व रा. बिजाढना, पो.स्टे इटावा, ता. तामिया जि. छिंदवाडा राज्य मध्यप्रदेश हे गुन्हा करून फरार झाले होते. घटनास्थळास उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, अमळनेर भाग अमळनेर व अमळनेर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी दत्तात्रय निकम यांनी तात्काळ भेट देवुन आरोपीतांना पकडणे करीता पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दत्तात्रय निकम यांनी पोउपनि.भगवान शिरसाठ, पोहेकॉ.विजय भोई, पोकॉ.राहुल गोकुळ पाटील, पोकॉ.राहुल नारायण पाटील अशांचे पथक तयार करून आरोपीतांचा शोध घेण्याचा आदेश दिला.
या पथकाने आरोपीतांची गोपनीय माहिती काढुन मध्यप्रदेश राज्यातील छिंदवाडा जिल्ह्यातील तामिया तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात जावुन सदर गुन्ह्यातील आरोपीतांना जेरबंद करून त्यांच्याकडे त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले असुन गुन्ह्याचा पुढील तपास मा. पोलिस निरीक्षक श्री दत्तात्रय निकम हे करीत आहेत.
सदरची कामगिरी जळगांव जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. महेश्वर रेड्डी सो, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर-पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अमळनेर भाग विनायक कोते यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोउपनि. भगवान शिरसाठ, पोहेकॉ. विजय भोई, पोकॉ. राहुल गोकुळ पाटील, पोकों. राहुल नारायण पाटील यांनी केली आहे.