जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव येथे आज १ जुलै, ‘कृषिदिन’ निमित्त राजर्षी छत्रपती शाहू महाराज, जिल्हा परिषद जळगाव या ठिकाणी कृषी क्रांतीचे जनक स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.आज १ जुलै हा दिवस महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील कृषिक्रांतीचे जनक, स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद सीईओ मीनल करणवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.