जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जिल्ह्यातील अमळनेर पोलीस स्टेशनच्या वतीने शहराच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कंट्रोल रूमचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास खासदार मा.श्रीमती स्मिताताई वाघ, जिल्हा पोलीस अधीक्षक मा. डॉ. श्री. महेश्वर रेड्डी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
शहरातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी एकूण 110 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, त्याद्वारे शहरातल्या कायदा व सुव्यवस्थेवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवता येणार आहे. या उपक्रमामुळे नागरिकांच्या सुरक्षेत लक्षणीय वाढ होणार असल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले.