एरंडोल | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :– एरंडोल तालुक्यातील मौजे उत्राण-एरंडोल मार्गावर अवैध वाळू वाहतूक करणारी एक हायवा गाडी महसूल विभागाच्या पथकाने पकडली आहे. ही कारवाई तहसीलदार प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून, सदर हायवा गाडी तहसील कार्यालय, एरंडोल येथे जप्त करण्यात आली आहे.
अवैध गौण खनिज वाहतूक रोखण्यासाठी प्रशासन सज्ज असून, या कारवाईत निवासी नायब तहसीलदार घुले, मंडळ अधिकारी भरत पारधी, तलाठी राहुल आहिरे, तलाठी मनोज सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीवर कडक धोरण राबवले जात असून, यासंदर्भात महसूल प्रशासनाकडून सातत्याने कारवाई करण्यात येत आहे.
या प्रकारच्या कारवायांमुळे वाळू माफियांना आळा बसेल, अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे. तालुक्यात अवैध खनिज उत्खनन व वाहतुकीविरुद्ध प्रशासनाची कारवाई भविष्यातही सुरूच राहणार असल्याचे तहसीलदारांनी स्पष्ट केले.