नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय मुक्ताईनगर आयोजित ग्रामीण कृषी जागरुकता कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत नशिराबाद येथे कृषी कन्यांकडून दुग्धजन्य पदार्थ निर्मितीवर एक प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात ग्रामीण भागातील शेतकरी तसेच महिला यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविलला प्रात्यक्षिकात तुप, पानिर, श्रीखंड, लस्सी, दही यांसारख्या पदार्थांची माहिती देऊन बासुंदी या पदार्थाची प्रत्यक्ष निर्मिती करून दाखवण्यात आली. त्यांनी दुध प्रक्रिया स्वच्छता, साठवणूक व मुल्यवर्धनाच्या विविध तंत्रज्ञानांची सखोल माहिती दिली. तसेच नाशवंत दुधाचा योग्य वापर केला तर या पासून अधिक नफा भेटू शकतो हे देखील पटवून दिले.या उपक्रमामुळे ग्रामीण भागात दुग्ध व्यवसायास चालना मिळून शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ घेता येईल, असा विश्वास कृषीकन्यांनी या कार्यक्रमा दरम्यान व्यक्त केला.
या कार्यक्रमासाठी मुक्ताईनगरचे कृषि महाविद्यालय सहयोगी अधिष्ठाता डॉ. संदिप पाटील, कृषि जागरुकता कार्यक्रमाचे चेअरम डॉ.दत्तात्रय पाचारणे, कार्यक्रम समन्वयक डॉ. बाळासाहेब रोमाडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. सागर बंड व संबंधित विषयातील विशेष तज्ञांचे मार्गदर्शन कृषि कन्यांना लाभले.