Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeक्राईमधुळेचा सराईत मोटारसायकल चोर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

धुळेचा सराईत मोटारसायकल चोर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :– धुळे जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार शेख इमरान शेख रफिक (वय २४) व त्याचा साथीदार शेख अकिल शेख शफिक (वय २७) यांना मोटारसायकल चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा, जळगावने अटक केली आहे.

पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी पथकास विशेष सुचना दिल्या होत्या.दिनांक ३ जुलै रोजी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, भडगाव पोलीस ठाणे हद्दीत आरोपी मोटारसायकली चोरी करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर, त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली. आरोपी पाचोऱ्यात येणार असल्याचे समजल्यावर पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.

चौकशीत त्यांनी भडगाव येथील दोन ठिकाणांवरून (विजय हॉटेल समोर व खोल गल्लीतील सलून दुकानासमोर) हिरो कंपनीची HF Deluxe व बजाज प्लॅटीना मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. यासंदर्भात भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.पुढील चौकशीत आरोपी इमरानकडे आणखी एक अॅक्टिव्हा प्रकारची काळ्या रंगाची मोपेड असल्याचे समोर आले आहे. तसेच त्याच्यावर धुळे जिल्ह्यात घरफोडी व मालमत्तेविरुद्ध गुन्हेही दाखल असल्याची माहिती मिळाली आहे.

ही कारवाई पो.उ.नि. शेखर डोमाळे, पो.हे.कॉ. लक्ष्मण पाटील, संदिप पाटील, पो.ना. राहुल पाटील, पो.कॉ. जितेंद्र पाटील व भुषण पाटील यांच्या पथकाने केली.आरोपींना पुढील कारवाईसाठी भडगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या