Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeभुसावळभुसावळ तहसीलदारांची अवैध गौणखनिज कारवाई ; अवैध वाळू जप्त, घरकुल लाभार्थ्यांसाठी वाटप!

भुसावळ तहसीलदारांची अवैध गौणखनिज कारवाई ; अवैध वाळू जप्त, घरकुल लाभार्थ्यांसाठी वाटप!

भुसावळ | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- भुसावळ तहसीलदार श्रीमती नीता लबडे यांनी आपल्या पथकासह भानखेडे- जोगलखेडे जंगल परिसरात अचानक छापा टाकून अंदाजे ६० ब्रास अवैध वाळू जप्त केली आहे. झाडाझुडपांत लपवून ठेवलेल्या या वाळूला प्रशासनाने ताब्यात घेऊन सुरक्षित ठिकाणी ठेवले आहे.

तहसील कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेली वाळू उद्या घरकुल लाभार्थ्यांना वाटप केली जाणार आहे, ज्यामुळे घरकुल योजना अंतर्गत गरीबांना मदत होईल. या कारवाईमुळे वाळू माफियांसमोर प्रशासनाचा कटाक्ष ठळक झाला आहे.भुसावळ तहसील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत स्पष्ट केले की, अवैध वाळूचा जप्ती व जनहितासाठी वापर हा प्रशासनाचा प्राथमिक उद्देश आहे. पारदर्शकता आणि न्याय्य वितरण प्रक्रियेवर भर देत, या वाळूचा वापर लोककल्याणासाठी होणार आहे.

तहसीलदार नीता लबडे यांनी याबाबत सांगितले, “अवैध वाळू उपशावर कठोर कारवाई करणे आणि जप्त केलेल्या वाळूचा जनहितासाठी उपयोग करणे ही आमची जबाबदारी आहे. आम्ही वाळूमाफियांना कधीही माफ करू नये.”

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या