Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeक्राईमपळसखेडे येथे अवैध वाळू-मुरूम साठ्यावर महसूल विभागाची कारवाई

पळसखेडे येथे अवैध वाळू-मुरूम साठ्यावर महसूल विभागाची कारवाई

जप्त साठ्याचा लाभ घरकुल लाभार्थ्यांना देण्याचे नियोजन

जामनेर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- तालुक्यातील पळसखेडे बु. येथील प्रकाशचंद जैन बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या बांधकामस्थळी वाळू व मुरूमचा मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर साठा आढळून आला. यानंतर तहसीलदार जामनेर श्री नानासाहेब आगळे यांनी स्वतः भेट देत स्थळाची पाहणी केली.

कारवाईदरम्यान १६० ब्रास वाळू आणि ६५ ब्रास मुरूम असा साठा जप्त करण्यात आला असून, सदर साठ्यासाठी कोणतीही कायदेशीर परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले आहे.या जप्त साठ्याचा वापर घरकुल लाभार्थ्यांना होण्यासाठी शासन धोरणानुसार वितरणाचे नियोजन सुरू करण्यात आले आहे. यामुळे गोरगरीब लाभार्थ्यांना बांधकामासाठी आवश्यक असलेले गौण खनिज सहज उपलब्ध होणार आहे.

या कारवाईमुळे अवैध गौण खनिज साठ्यावर नियंत्रण ठेवण्यासोबतच संसाधनांचा गरजूंसाठी योग्य वापर सुनिश्चित झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जिल्हा प्रशासनाच्या या पावलाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या