भुसावळ | जीवन वारके | पोलीस दक्षता लाईव्ह :- भुसावळ शहरातील सार्वजनिक रस्ते, पदपथ आणि शासकीय जागांवर करण्यात आलेली बेकायदेशीर अतिक्रमणे हटवण्यासाठी नगरपरिषदेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत विविध ठिकाणी कार्यवाही करत अनधिकृत टपऱ्या, गाड्या, शेड्स आणि इतर अडथळे हटवण्यात आले.नगरपरिषदेचे कर्मचारी आणि पोलिस दल यांच्या उपस्थितीत ही मोहीम शांततेत पार पडली. कारवाईमुळे अनेक व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपले अतिक्रमण काढून टाकले, तर काहींवर थेट यंत्राच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली.
कारवाईची ठळक वैशिष्ट्ये –
भुसावळ नगरपरिषदेच्या या कारवाईमध्ये मुख्यतः महत्वाचे वर्दळीचे रस्ते व चौकांमधील असलेले अडथळे हटविण्यात आले. ज्या पदपथ रस्त्यांवर अतिक्रमण होते ते पदपथ रस्ते मोकळे करून देण्यात आले, तसेच ज्या शासकीय जागांवरती अतिक्रमन होते ते हटवून त्या शासकीय जागा अतिक्रमणमुक्त करण्यात आल्या.
नगरपरिषदेचा स्पष्ट इशारा:
“शहरात कुणीही शासकीय जागेवर अतिक्रमण केल्यास त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. भविष्यात अशा प्रकारचे अतिक्रमण सहन केले जाणार नाही.”
नगरपरिषदेने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, शहर स्वच्छ, मोकळे आणि अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले आहे.