जळगाव / जीवन वारके / पोलीस दक्षता लाईव्ह :- भुसावळ तालुक्यातील चोरवड येथे आयोजित “एक पेड माँ के नाम 2.0” महावृक्षारोपण कार्यक्रम केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
रावेर लोकसभा अंतर्गत चोरवड (भुसावळ) येथे युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, जिल्हा प्रशासन जळगांव आणि ‘मेरा युवा भारत’ जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “एक पेड माँ के नाम 2.0” – महावृक्षारोपण कार्यक्रम श्रीमती खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ‘मेरा युवा भारत’, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.