विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करून
कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
जामनेर | श्रीकांत अहिरे | पोलीस दक्षता लाईव्ह :- जामनेर तालुक्यातील टाकळी येथील धनाई बालक मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला…तद्नंतर सर्व विद्यार्थी रिंगण करून विठ्ठल नामाचा गजरात पाऊल्या खेळले तर इयत्ता 5वी चे विद्यार्थी चिन्मय गायकवाड याने मृधुंग वाजवून, वरद सपकाळ, जयेश सपकाळ, प्रथमेश सपकाळ, प्रसाद पाटील, कुणाल सपकाळ, राजनंदिनी गायकवाड यांनी विठू नामाचा गजर करत सर्व पालकांची मने जिंकली. यावेळी सर्व विद्यार्थी, संचालक, शिक्षक यांनी विठ्ठल नामाचा गजर करत पाऊल्या व फुगळ्या खेळत टाळ, मृदंग, ढोल ताशाच्या च्या गजराने संपूर्ण टाकळी परिसर जणू काही प्रति पंढरपूर चे स्वरूप शाळेच्या आवारात निर्माण झाले होते.
या कार्यक्रमात विठ्ठलाचे वेशभूषेत कार्तिक सारंगधर चवरे तर रुक्मिणी वेशभूषेत ओजस्विनी उमेश बंडे हे विद्यार्थी होते.
या कार्यक्रमाचे नियोजन बालक मंदिराच्या संचालिका सौ दिपाली श्रीकांत अहिरे मॅडम आणि दिपली गजानन कोळी मॅडम यांनी केले त्यांना श्रीकांत सारंगधर अहिरे सरांचे मार्गदर्शन लाभले.