जळगाव / प्रतिनिधी / पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नुकतीच दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल प्रकल्पास भेट दिली. या प्रकल्पात दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर आणि दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी मोफत निवासी शिक्षण व प्रशिक्षण दिले जाते.
भेटीदरम्यान आयुष प्रसाद यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली, विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि कार्यपद्धती जाणून घेतली.विशेषतः, अनाथ व दिव्यांग असलेला एक विद्यार्थी ज्याने अलीकडेच मनोबलमध्ये प्रवेश घेतला, त्याच्याशी संवाद साधताना मा.आयुष प्रसाद हे उपस्थित होते हा क्षण मानवी संवेदनशीलतेचे प्रत्यंतर देणारा ठरला.
संस्थेच्या कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी काही मौलिक सूचना दिल्या आणि “समाजातील प्रत्येकाने अशा उपक्रमांची माहिती घ्यावी आणि शक्य तितका सहभाग द्यावा,” असे आवाहन केले.याच वेळी मा.आयुष प्रसाद यांनी संस्थेस वैयक्तिक आर्थिक मदत करून आपली सामाजिक बांधिलकीही अधोरेखित केली.