Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणकडगाव येथे महसूल विभागाची कारवाई : 40 ब्रास अवैध वाळू जप्त

कडगाव येथे महसूल विभागाची कारवाई : 40 ब्रास अवैध वाळू जप्त

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:- कडगाव येथे दि.6 जुलै रोजी महसूल विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत अंदाजे 40 ब्रास अवैध वाळूचा साठा जप्त करण्यात आला आहे. ही वाळू कोणतीही कायदेशीर परवानगी नसताना साठवून ठेवण्यात आली होती.

महसूल विभागाच्या विशेष पथकाने स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पाडली.
या कारवाईत मंडळ अधिकारी नशिराबाद, मंडळ अधिकारी म्हसावद, ग्राम महसूल अधिकारी कडगाव, पोलीस पाटील कडगाव यांचा समावेश होता.कारवाईदरम्यान साठवलेली वाळू रीतसर पंचनामा करून पोलीस पाटील, सरपंच व उपसरपंच कडगाव यांच्या ताब्यात देण्यात आली आहे. ताबा-पावतीची कार्यवाही पंचांसमक्ष पूर्ण करण्यात आली.

महसूल विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अवैध वाळू उपसा व साठवणूक थांबवण्यासाठी विभाग सतत कारवाई करत असून, अशा प्रकारच्या गैरकायद्या विरोधात कडक उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या