Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्याब्रेकिंग न्यूज: राज ठाकरे यांचा युतीवर बोलण्यास अंकुश ; पदाधिकाऱ्यांना बोलण्यावर बंदी

ब्रेकिंग न्यूज: राज ठाकरे यांचा युतीवर बोलण्यास अंकुश ; पदाधिकाऱ्यांना बोलण्यावर बंदी

मुंबई | प्रतिनिधी | पोलीस दक्षात लाईव्ह:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युती संदर्भात पक्षातील पदाधिकाऱ्यांना कोणतेही विधान करण्यापूर्वी त्यांची परवानगी घेण्याचे आदेश दिले आहेत. “युतीबाबत कोणीही काही बोलू नये, आधी मला विचारावे,” असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत.

या सूचनेमुळे नुकत्याच झालेल्या विजयी मेळाव्यानंतर उत्साहात असलेल्या मनसे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मेळाव्यातील ऐतिहासिक स्वागतामुळे आगामी राजकीय युतीबाबत चर्चा सुरू झाली होती. मात्र, ठाकरे यांच्या नव्या आदेशामुळे त्या चर्चेला ब्रेक लागला आहे.

पक्षाकडून देण्यात आलेल्या निर्देशांनुसार, कोणताही पदाधिकारी माध्यमांशी किंवा सार्वजनिक व्यासपीठावर युतीवर भाष्य करणार नाही. पक्षांतर्गत शिस्त राखण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे. राजकीय वर्तुळात या निर्णयाकडे संभाव्य युती आणि पक्षाच्या आगामी रणनीतीच्या दृष्टीने पाहिले जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या