Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्याशेतकऱ्यांसाठी दिलासा : जिल्हा परिषद जळगावमध्ये कृषी निविष्ठा तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित

शेतकऱ्यांसाठी दिलासा : जिल्हा परिषद जळगावमध्ये कृषी निविष्ठा तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शेतकरी बांधवांसाठी एक सकारात्मक पाऊल उचलत जिल्हा परिषद जळगावच्या कृषी विभागात बियाणे, खते व कीटकनाशके यांच्या तक्रारींसाठी विशेष तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यात आला आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी निविष्ठा संबंधित अडचणींवर तत्काळ आणि प्रभावी तोडगा मिळणार आहे.

जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत कृषी विकास अधिकारी कार्यालयाने यासाठी व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक 9307076107 उपलब्ध करून दिला आहे. शेतकरी बंधूंनी त्यांच्या तक्रारी या क्रमांकावर थोडक्यात व स्पष्ट स्वरूपात लिहून पाठवाव्यात, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.या कक्षाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बियाण्यांची गुणवत्तेची शंका, खते अपुरी मिळणे, नकली कीटकनाशकांचा त्रास अशा समस्यांवर त्वरित आणि प्रभावी कारवाई करण्यात येणार आहे.

प्रमुख उद्देश :-

कृषी विभागाचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांच्या समस्यांचे निवारण करून शाश्वत शेतीस प्रोत्साहन देणे व जिल्ह्यातील कृषी व्यवस्था सक्षम करणे.

तक्रारी पाठविण्यासाठी संपर्क:
व्हॉट्सअ‍ॅप नंबर – 9307076107
कृषी विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जळगाव

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या