रावेर(पाल) | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:- रावेर तालुक्यातील पाल गावामध्ये दि. १० जुलै २०२५ रोजी गुरु पौर्णिमेनिमित्त सालाबादाप्रमाणे मोठा उत्सव होणार आहे. या उत्सवामध्ये सुमारे १ लाख भाविक सहभागी होण्याची शक्यता आहे.उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसुविधा, वाहतूक व्यवस्था, आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता, तसेच कायदा व सुव्यवस्था यांचा सुसूत्र आणि कार्यक्षम व्यवस्थापनासाठी दिनांक ४ जुलै रोजी तहसील कार्यालय, रावेर येथे बैठक आयोजित करण्यात आली.
बैठकीस तहसीलदार बी.ए. कापसे यांनी अध्यक्षस्थानी राहून संबंधित सर्व विभागांचे अधिकारी – पोलीस, महसूल, ग्रामपंचायत, आरोग्य, विद्युत, सार्वजनिक बांधकाम, परिवहन इत्यादींची उपस्थिती राहणार आहे.भाविकांसाठी आवश्यक सुविधा करण्यात आली आहे. तसेच वाहतुकीचे नियोजन ,स्वयंसेवकांची नियुक्ती, स्वच्छतागृह, पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय मदत केंद्र पोलिस बंदोबस्त आणि नियंत्रण कक्ष आदी असणार आहे.
पाल येथील गुरु पौर्णिमा उत्सव भाविकांसाठी सुरळीत व भक्तिपूर्ण वातावरणात पार पडावा यासाठी प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध आहे.