मुंबई | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- महाराष्ट्र शासनाच्या Ease of Doing Business उपक्रमांतर्गत मैत्री 2.0 प्रणाली आता पर्यावरणविषयक परवाना प्रणालीत नवे युग घेऊन आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) यामार्फत औद्योगिक परवाने — Consent to Establish/Operate जलदगतीने आणि पारदर्शक पद्धतीने देण्याची प्रणाली उभारली आहे.
या प्रणालीच्या वैशिष्ट्यांमध्ये प्रत्येक अर्ज निश्चित कालमर्यादेत निकाली काढणे अनिवार्य करण्यात आले आहे. दिलेल्या वेळेत निर्णय न झाल्यास तो अर्ज स्वयंचलितरित्या उच्चस्तरीय समितीकडे पाठवला जातो, ज्यामुळे निर्णय प्रक्रियेत कोणताही दिरंगाई न होता उत्तरदायित्व आणि काटेकोर मॉनिटरिंग सुनिश्चित होते.
ही सुधारणा माजी जिल्हाधिकारी जळगाव तथा सध्याचे MPCB चे सदस्य सचिव मा. डॉ. अविनाश ढाकणे यांच्या दूरदृष्टीने शक्य झाली. त्यांनी संपूर्ण परवाना प्रक्रियेसाठी डॅशबोर्ड आधारित मॉनिटरिंग यंत्रणा कार्यान्वित करून, संबंधित अधिकाऱ्यांची कार्यक्षमता थेट नोंदवण्यास सुरुवात केली आहे.
सब-रिजनल ऑफिसर MPCB डॅशबोर्ड आता अधिकाऱ्यांसाठी पारदर्शक मार्गदर्शक ठरत असून, नवीन अर्ज, स्थिती, व कार्यवाही यांची स्पष्ट माहिती यात सहज पाहता येते.
या उपक्रमामुळे उद्योगपतींसाठी परवाने मिळवणे सोपे झाले असून, पर्यावरणीय जबाबदारीही जोपासली जाते.