Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeअमळनेरअमळनेर शहरातील चारचाकी वाहन चोरी प्रकरण उघडकीस

अमळनेर शहरातील चारचाकी वाहन चोरी प्रकरण उघडकीस

अमळनेर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:- दि. 24 मे 2025 रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास ते 25 मे रोजी पहाटे 5 वाजेदरम्यान अमळनेर येथील ओमसाई श्रद्धा नगर भागातील प्रविण हरिश्चंद्र ठाकूर यांची मारुती सुझुकी डिझायर (MH18 AJ 3110) ही चारचाकी गाडी घरासमोरून अज्ञात व्यक्तीने चोरली. सदर प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीच्या आधारे अमळनेर पोलीस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण पथकाने मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील रावठी गावात छापा टाकून संबंधित गाडी मिळवली. झडती दरम्यान एकूण तीन गाड्या जप्त करण्यात आल्या त्यात टोयोटा फॉर्च्युनर (क्र. CG10 BL6776) — अंदाजे किंमत ₹35 लाख, हुंडाई क्रेटा (क्र. MP04 ZL2963) — अंदाजे किंमत ₹12 लाख, मारुती सुझुकी डिझायर (क्र. MH18 AJ 3110) तपासादरम्यान हे उघड झाले की फॉर्च्युनर ही नागपूर शहरातील व क्रेटा ही जळगाव तालुक्यातील वाहन चोरी प्रकरणात वापरलेली होती.

ही कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर व उपविभागीय अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या