जळगाव / प्रतिनिधी / पोलीस दक्षता लाईव्ह :- गुरू पौर्णिमे निमित्त स्वामी नारायण मंदिर भुसावळ रोड, दूर दर्शन टॉवर जवळील मंदिरात गुरु परमात्मा परेशु .. या संकल्पना अंतर्गत भक्ती गीते आणि मराठी- हिंदी भजन व अभंग सेवा स्वरवेध तर्फे आज सकाळी 9 ते 12 पर्यंत सादर करण्यात आली. या सेवेत जेष्ठ गायक नीलकंठ कासार ,दिलीप चौधरी व भागवत पाटील यांनी विविध भक्ति गीते सादर केलीत. मंदिरात सांगीतिक गुरू दुष्यंत जोशी यांनी व शरद पांडे यांनी भेट दिली.
याप्रसंगी भक्ती गीत सुद्धा सादर केलीत. मंदिराचे सेवेकरी श्री सुदर्शनजी यांनी सुंदर निवेदन केले. मंदिराचे व्यवस्थापक नयन स्वामी यांनी सर्व छान व्यवस्था करून ही सांगीतिक सेवा स्वामी नारायण चरणी स्वरवेध तर्फे सादर करण्याची संधी दिली. याप्रसंगी मंदिर प्रशासनचे मनस्वी आभार मानण्यात आले.