जळगांव /प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- येथील नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था व नूतन मराठा महाविद्यालय यांच्यातर्फे गणेश कॉलनीतील नूतन मराठा महाविद्यालयाच्या जागेत वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी करंज, शिसम, लिंब,पिंपळ या वृक्षाची रोपे लावण्यात आली.
या प्रसंगी प्राचार्य एल.पी. देशमुख, बाल निरिक्षण गृहाचे अधिक्षक रविकिरण अहिरराव, पंकज पाटील, जैन इरिगेशन सिस्टीमचे पर्यावरण विभागाचे राजेद्र राणे, नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा मनीषा पाटील, शक्ति महाजन, आशा मौर्य,हर्षा गुजराती, किमया पाटील, शिल्पा बयास, कांचन पाटील, रेणुका हिंगु,अर्चना पाटील, गांधी रिसर्च फाउंडेशनचे विक्रम अस्वार हरित सेनेचे प्रवीण पाटील, लेफ्टनंट प्रा.शिवराज पाटील प्रा.गौतम भालेराव आणि एन.सी.सी कॅडेट उपस्थित होते.