जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- पैसे व दागिने घेऊन जळगावच्या मुलीचे लग्न लावून दिल्याप्रकरणी मीना प्रकाश बोरसे हिला बुधवारी (९ जुलै) मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर येथून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत.
जळगाव येथील एका अल्पवयीन मुलीचे कोल्हापूर येथील तरुणाशी परस्पर लग्न लावून देण्यात आले होते. यासाठी मुलीच्या कुटुंबाकडून पैसे व दागिने घेण्यात आले. मात्र, हे लग्न व इतर गोष्टींचा निषेध करत पीडित मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केली होती. या प्रकरणी पाच जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याशिवाय कोल्हापूर येथील आशिष गंगाधरे यांच्या फिर्यादीवरून मीना बोरसे विरोधात बलात्कार, पोक्सो कायदा आणि इतर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथेही तिच्याविरोधात फसवणूक व लग्नाचे आमिष दाखवून आर्थिक लाभ घेतल्याचा गुन्हा नोंदवलेला आहे.
बुऱ्हाणपूर येथून तिला अटक केल्यानंतर जळगाव पोलिसांनी तिला न्यायालयात हजर केले असून पुढील तपास सुरू आहे.