जळगाव/प्रतिनिधी / पोलीस दक्षता लाईव्ह :- राज्य शासनाच्या बाल विकास आयुक्तालय संचलित शासकीय आशादिप महिला वस्तीगृह गेल्या काही महिन्यांपासून अनेक कारणांनी चर्चेत आहे. असे असताना पुन्हा एकदा एका ३२ वषीय मतिमंद महिलेला वस्तीगृहातील दुसऱ्या एका मुलीने मारहाण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना सी.सी.टीव्ही मध्ये कैद झाली. विशेष म्हणजे ही घटना महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेने उघड झाली आहे.
या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगाव शहरातील गणेश कॉलनी परिसरातील शासकीय आशादिप महिला वसतीगृह येथे एका ३२वर्षीय मतीमंद मुलीला याच वस्तीगृहातील एक दोन मुलींनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत महिला पोलीस कर्मचारीने अधीक्षक यांच्यासह जिल्हा महिला बालविकास अधिकारी श्री.तडवी यांच्याकडे ही तक्रार करण्यात आली असता त्यांनी तात्काळ यावर चौकशी समिती नेमली आणि सर्व घटनेचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली आहे. मात्र, या जळगावच्या आशादिप वस्तीगृहातील महिला अधीक्षकांनी अद्याप वरिष्ठ आधिकाऱ्यांकडे कुठलीही तक्रार दिलेली नाही.
आज दि.११ रोजी अधिकाऱ्यांनी या वस्तीगृहाची पाहणी करून चौकशी सुरु केली असल्याचे सांगितले आहे. यावर आता चौकशी समिती नेमली गेली आहे. या घटनेची सखोल माहिती घेण्याचे काम सुरु आहे.दरम्यान आशादिप महिला वस्तीगृहात दर काही महिन्यांनी काही ना काही घटना घडतच असते..याकडे वरिष्ठांनी गांभीर्याने लक्ष घालावे अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.