मुंबई | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:- राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय जाहीर करत मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत “समग्र शेतरस्ता योजना” राबविण्याची घोषणा केली.
या योजनेतून राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत रस्ता पोहोचविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही घोषणा आज पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात करण्यात आली.
योजनेची वैशिष्ट्ये:
प्रत्येक शेताला रस्ता उपलब्ध करून देण्यात येणार
विविध शासकीय योजनांतील निधींचा समन्वय साधून कामे पूर्ण केली जाणार
राज्यातील सर्व जिल्ह्यांतील शेतरस्त्यांची प्रलंबित मागणी पूर्ण केली जाणार
योजनेसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन :
या योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होण्यासाठी महसूल मंत्री मा. ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन:
“ही योजना म्हणजे शेतकऱ्यांच्या दैनंदिन अडचणींवर नेमकी बोट ठेवणारी आणि ग्रामीण विकासाला चालना देणारी ठरणार आहे.”