Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeभुसावळभुसावळ येथे सायबर सुरक्षा व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

भुसावळ येथे सायबर सुरक्षा व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

के. नारखेडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात कार्यक्रम संपन्न..

भुसावळ | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- भुसावळ शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील के. नारखेडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आज सायबर सुरक्षा व विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे नेमणुकीस असलेले API श्री. राहुल भंडारे यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्हेगारी, वाहतूक नियम व स्वतःच्या सुरक्षिततेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

भंडारे यांनी विद्यार्थ्यांना सोशल मिडियाचा सुरक्षित वापर, डायल-112 आपत्कालीन सेवा, तसेच कोणत्याही अडचणींच्या वेळी पोलिसांशी थेट संपर्क साधण्याचे महत्त्व पटवून दिले. विशेषतः विद्यार्थिनींना आत्मविश्वासाने व सुरक्षिततेने वावरावे, कोणतीही शंका अथवा त्रास असल्यास तात्काळ गुरुजन अथवा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असा सल्ला दिला.

कार्यक्रमास सुमारे 900 विद्यार्थी व विद्यार्थिनींसह 40 शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून शाळेचे मुख्याध्यापक व इतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षा आणि वैयक्तिक सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण झाली असून, समाजात सकारात्मक संदेश पसरविण्याचा प्रयत्न यामार्फत करण्यात आला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या