Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगावराज्यसभेसाठी राष्ट्रपतींकडून चार नामवंत व्यक्तींची नियुक्ती ; उज्ज्वल निकम यांचाही समावेश

राज्यसभेसाठी राष्ट्रपतींकडून चार नामवंत व्यक्तींची नियुक्ती ; उज्ज्वल निकम यांचाही समावेश

नवी दिल्ली | वृत्तसेवा | पोलीस दक्षता लाईव्ह :- भारतीय राज्यघटनेच्या कलम ८०(१)(अ) व उपकलम (३) अन्वये राष्ट्रपतींकडून राज्यसभेसाठी चार नामांकित व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये प्रसिद्ध सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम, केरळातील जेष्ठ समाजसेवक सी. सदानंदन मास्टे, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रिंगला, आणि इतिहासकार डॉ. मीनाक्षी जैन यांचा समावेश आहे.

या चार सदस्यांची नियुक्ती, मागील नामनिर्दिष्ट सदस्यांच्या निवृत्तीनंतर निर्माण झालेल्या रिक्त जागा भरण्यासाठी करण्यात आली आहे.

अँड. उज्ज्वल निकम यांनी १९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोट, प्रशांत बजाज खून प्रकरण, अंजलीबाई हत्याकांड, अजमल कसाब खटला यांसह अनेक खटल्यात यशस्वी बाजू मांडत देशात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सी. सदानंदन मास्टे हे शिक्षण व समाजसेवेच्या क्षेत्रात गेली अनेक दशके कार्यरत आहेत.
हर्षवर्धन श्रिंगला यांनी परराष्ट्र सचिव म्हणून भारताचे जागतिक पातळीवर प्रतिनिधित्व केले आहे.
डॉ. मीनाक्षी जैन या इतिहास लेखनात राष्ट्रवादी दृष्टिकोन रुजवणाऱ्या प्रमुख अभ्यासक म्हणून ओळखल्या जातात.

या नियुक्तीमुळे राज्यसभेतील बौद्धिक प्रतिनिधित्व आणखी समृद्ध होईल, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे.

दरम्यान, अँड. उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीचे महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यात सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या