अंतर्गत रस्त्यांवर रिक्षांना बंदी, बस मार्गात बदल, भाडेवाढ निश्चित
भुसावळ | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:- भुसावळ शहरातील अतिवर्दळीचा स्टेशन रोड आजपासून दीड महिन्यासाठी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. बाजारपेठ पोलिस ठाणे ते अमर स्टोअर्स (रेल्वे वस्तू संग्रहालय) दरम्यान रस्त्याचे काँक्रिटीकरण होणार असून, यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक बदल करण्यात आले आहेत.
मुख्य ठळक मुद्दे :
स्टेशन रोड 15 जुलै मध्यरात्रीपासून बंद.
काँक्रिटीकरणामुळे बंदीचा निर्णय.
बसस्थानक पूर्ववत; मात्र बसमार्ग वरणगाव रोडने वळवले.
अंतर्गत रस्त्यांवर रिक्षांना बंदी.
प्रवाशांसाठी तात्पुरती एसटी भाडेवाढ
वाहतूक मार्गातील बदल
स्टेशन रोड बंद झाल्यामुळे यावल, रावेर, फैजपूर, बऱ्हाणपूर, जामनेर रोडवरील बसेस आता थेट वरणगाव मार्गे बसस्थानकात दाखल होतील. त्यामुळे बसेसच्या मार्गात अंतर वाढल्याने तात्पुरती भाडेवाढ होणार आहे. यासंदर्भात आज जळगाव येथे महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे व्यवस्थापक राकेश शिवदे यांनी दिली.
रिक्षांवरील निर्बंध
स्टेशन रोडवरील वाहतूक बंद असल्यामुळे व्ही.एम. वॉर्ड, राम मंदिर वॉर्ड, मॉडर्न रोड या भागातून जाणाऱ्या रिक्षा बंद करण्यात आल्या आहेत. फक्त दुचाकी व पादचारी यांना या मार्गांचा वापर करता येणार आहे. रेल्वे स्थानकासाठी उत्तरद्वार, तर बसस्थानकासाठी वरणगाव मार्गाचा वापर रिक्षांना करावा लागणार आहे.
अधिकाऱ्यांची बैठक
या निर्णयाबाबत झालेल्या बैठकीस सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश महाले, नगरपालिकेचे अभियंता पंकज मदगे, एसटीचे व्यवस्थापक राकेश शिवदे, वाहतूक निरीक्षक पी. व्ही. पाटील आणि ठेकेदार आशिक तेली हे उपस्थित होते.
सूचना नागरिकांसाठी:
➡️ प्रवासापूर्वी मार्ग तपासा.
➡️ रिक्षा सेवेसाठी नवीन मार्गांची माहिती घ्या.
➡️ भाडेवाढीची शक्यता लक्षात घ्या.
➡️ दुचाकी व पादचाऱ्यांनी स्थानिक मार्गच वापरावा.