Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeक्राईमजबरदस्तीने चोरी करणाऱ्या चोरांचा पोलिसांकडून शोध, चार आरोपींना अटक

जबरदस्तीने चोरी करणाऱ्या चोरांचा पोलिसांकडून शोध, चार आरोपींना अटक

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- कजगांव जवळील गोडगांव रोडवर सकाळी सायंकाळी ७.४५ वाजता एका व्यक्तीवर चोरट्यांनी जोरदार हल्ला केला. ईंटसाईंड बँक लिमिटेडच्या फील्ड असिस्टंट मॅनेजर विक्की विठोबा पाटील या व्यक्तीच्या मोटारसायकलवर मागून दोन अनोळखी इसम रुमाल बांधून आले. त्यांनी त्याला शिवीगाळ केली, मोटारसायकलची चावी काढून रोडच्या बाजूला फेकली आणि फिर्यादीकडून ५८,४०० रुपये रोख आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू जबरदस्तीने हिसकावून घेतल्या.

या घटनेनंतर भडगाव पोलीस स्टेशनमध्ये ४०९ गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी तपासात चार संशयित आरोपी गोपाल संजय पारधी (वय ३२), मयुर ज्ञानेश्वर साळुंखे (वय २२), अतुल नाना पाटील (वय २६) आणि कैलास वाल्मिक पाटील (वय २७) यांना अटक केली आहे. आरोपींनी गुन्हा कबूल केला आहे.

पोलीस निरीक्षक सुशील सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू असून अजूनही काही आरोपींच्या शोधासाठी कारवाई सुरु आहे. जप्त केलेल्या मुद्देमालात रोख रक्कम, मोबाईल टॅब आणि बायोमॅट्रिक मशीन यांचा समावेश आहे. पोलीस अधिक्षक माहेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास चालू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या