Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeअमळनेरकिरकोळ वादातून तरुणाला मारहाण ; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

किरकोळ वादातून तरुणाला मारहाण ; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

अमळनेर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- कळमसरे गावात किरकोळ कारणावरून एका तरुणाला पाच जणांनी जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना १८ जुलै रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली असून, पीडित तरुणाच्या तक्रारीनंतर २० जुलै रोजी संध्याकाळी मारवड पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश दत्तू गायकवाड (वय २५, रा. कळमसरे) हा तरुण आपल्या घरात असताना जुन्या वादातून गावातील पाच व्यक्तींनी त्याच्याशी वाद घालून शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणात संजय शिवदास ठाकरे, सुरेश आबा भील, गणेश आबा भिल, लक्ष्मण प्रविण भिल आणि चेतन हिम्मत चौधरी अशी आरोपींची नावे असून, सर्वजण कळमसरे येथील रहिवासी आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड विधानांतर्गत संबंधित कलमानुसार गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या