नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वोदय माध्यमिक विद्यालयात आज दिनांक 23 जुलै रोजी सकाळी 11 ते 12 दरम्यान विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात सहायक पोलीस निरीक्षक ए.सी. मनोरे यांनी शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींना नवीन कायद्यांची माहिती देत मोबाईलचा योग्य वापर, गुड टच-बॅड टच, सायबर गुन्हे, सोशल मीडियाचा प्रभाव, वाहतुकीचे नियम, पोलीस काका-पोलीस दीदी योजना, डायल 112 चा वापर, वाईट सवयींपासून दूर राहणे, गुरुजनांचा आदर, तसेच अल्पवयीन विवाह टाळणे यासारख्या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.
या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. दिलीप चौधरी, शिक्षक वृंद आणि सुमारे ९० ते १०० विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
मार्गदर्शनानंतर श्री. मनोरे यांनी शिक्षक वृंदांशी संवाद साधत विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलीस स्टेशन व शाळा प्रशासन यांच्यात योग्य समन्वय ठेवण्याचे आवाहन केले.