Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगावबहिणाबाई प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात शिक्षक ; पालक सभा उत्साहात ..

बहिणाबाई प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात शिक्षक ; पालक सभा उत्साहात ..

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- येथील बहिणाबाई ज्ञान विकास संस्था संचलित प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक वर्ष 2025 – 2026 साठी शिक्षक – पालक संघाची पहिली सर्वसाधारण सभा शालेय स्तरावर उत्साहात झाली. या पहिल्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग रघुनाथ काळे होते.विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका व सध्या समन्वयक म्हणून कार्यरत असलेल्या प्रतिभा खडके, शिक्षक -पालक संघाचे माजी उपाध्यक्ष महेश जाधव विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. विलास नारखेडे व प्राथमिकचे मुख्याध्यापक राम महाजन इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

या सभेचे अध्यक्ष बंडूदादा काळे यांनी माते सरस्वतीचे पूजन करून माल्यार्पण केले .व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांनी देखील सरस्वतीचे पूजन करून अभिवादन केले.या पहिल्या सर्वसाधारण सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून ते कायम करण्यात आले. शैक्षणिक वर्ष 2025 – 2026 साठी नवीन कार्यकारणीची निवड उपस्थित सर्व पालकांमधून सर्वानुमते करण्यात आली. यामध्ये सुलताना पिंजारी , उपाध्यक्षा , बहिणाबाई बालक मंदिर जळगाव, सौ.निकिता भालेराव , उपाध्यक्ष , बहिणाबाई प्राथमिक विद्यामंदिर जळगाव.ललिता जाधव , उपाध्यक्ष , बहिणाबाई माध्यमिक विद्यालय जळगाव. या तीन पालकांची शिक्षक – पालक संघाच्या उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. या सभेचे अध्यक्ष बंडूदादा काळे यांनी निवड करण्यात आलेल्या उपाध्यक्ष व सदस्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.

या शिक्षक पालक सभेत विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास नारखेडे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने वर्षभरामध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे , क्रीडा स्पर्धांचे तसेच विविध कार्यक्रमांची माहिती उपस्थित सर्व पालकांना देण्यात आली. तसेच शासनातर्फे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्त्यांसंदर्भात आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती पालकांना देण्यात आली.तसेच या शिक्षक – पालक सभेसाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग रघुनाथ काळे उर्फ ( बंडूदादा काळे ) यांनी उपस्थित सर्व पालकांना शिक्षणाचे महत्त्व व शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची आणि भविष्यवेधी शिक्षणाच्या संदर्भात पालकांना उदबोधित केले.

सभेचे प्रास्ताविक , सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक पी.पी. चौधरी यांनी केले तर राजेश वाणी यांनी आभार मानले .
ही सभा यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे शिक्षक संतोष पाटील, विशाल पाटील, दिनेश चौधरी , चंद्रकांत पाटील, शंकर चव्हाण ,कुंवर सर,संतोष सोनार, दुर्गादास कोल्हे, जगदीश नेहते महेंद्र पाटील व शाळेतील शिक्षिका स्वाती कोल्हे , डॉ.प्रतिभा राणे, सौ.सिमा चौधरी सौ वैशाली पाटील , शरिफा तडवी , खूशी तडवी , पुनम तडवी मॅडम इत्यादी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या