जळगाव /विशेष प्रतिनिधी /प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह :- पुण्यातील खराडी परिसरातील एका उच्चभ्रू निवासी संकुलात रविवारी पहाटे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापेमारी करून रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला. या कारवाईत माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.दरम्यान या घटनेची जोरात चर्चा होत असून वाऱ्यासारखी पसरली आहे. याघटनेमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
छापेमारी आणि ताब्यात घेतलेले संशयित हे उच्चभ्रू कुटुंबातील ..
पुणे पोलिसांना खराडीतील एका फ्लॅटमध्ये ‘हाउस पार्टी’च्या नावाखाली रेव्ह पार्टी सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार, पहाटे साडेपाचच्या सुमारास गुन्हे शाखेने छापा टाकला. या कारवाईत तीन महिला आणि दोन पुरुष, असे एकूण पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतलेल्यांमध्ये प्रांजल खेवलकर यांचा समावेश आहे.ते माजीमंत्री आमदार एकनाथ खडसे यांचे जावई आहेत.
घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ, दारू आणि हुक्का जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या अमली पदार्थांचे प्रकार आणि प्रमाण याबाबत सखोल तपास सुरू आहे. संशयितांविरुद्ध नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सब्स्टन्सेस (NDPS) कायद्यांतर्गत तसेच अवैध दारू आणि हुक्का सेवनासंदर्भात संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात अमली पदार्थ आणि अवैध धंद्यांविरुद्ध सातत्याने कारवाई सुरू आहे. गेल्या पंधरा दिवसात अनेक कारवाया केल्या आहेत.या रेव्ह पार्टीमागील मुख्य सूत्रधार कोण..? अमली पदार्थांचा पुरवठा कुठून कुठून झाला ? आणि यामागे मोठे रॅकेट आहे का..? याचा तपास पोलिसांकडून सखोलपणे चौकशी सुरू आहे. तसेच संशयितांची कसून चौकशी केली जात आहे.तसेच याबाबत अधिक माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
खराडीत रेव्ह पार्ट्यांचे वाढते प्रमाण वाढत चालले आहे.
खराडी हा पुण्यातील आयटी हब आणि उच्चभ्रू वस्तीचा परिसर म्हणून ओळखला जातो.या परिसरात विविध शहरातील आणि राज्यातील महाविद्यालयीन आणि नागरिक वास्तव्यास आहेत. अनेक विद्यार्थी गेल्या काही वर्षांत या भागात आहेत.त्यामुळे रेव्ह पार्ट्यांचे प्रमाण वाढल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. यापूर्वीही पुणे पोलिसांनी अशा अवैध गोष्टींविरुद्ध कारवाया कडक केल्या आहेत. नागरिकांनी अशा घटनांची माहिती तात्काळ पोलिसांना कळवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.दरम्यान माजीमंत्री श्री.खडसे यांचे जावई खेवलकर यांचा रेव्ह पार्टीत सहभाग असल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.