रावेर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- रावेर यावल मतदारसंघातील विविध शासकीय विभागांची आढावा बैठक नुकतीच पार पडली.या बैठकीस महसूल, महावितरण, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, आदिवासी विकास, नगरपरिषद, ग्रामविकास आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी महसूल विभागाच्या संजय गांधी निराधार योजना,घरकुल,शेती मोजणी, नगरपरिषदेच्या स्वच्छता मोहीम, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन,महावितरण विभागाच्या वीजपुरवठा आणि सौरऊर्जा प्रकल्प, पोलिस विभागासोबत कायदा व सुव्यवस्था, अवैध गोतस्करी, आदिवासी विभागाच्या आदिवासी वस्तीचा सर्वांगीण विकास तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांची सद्यस्थिती तसेच सुधारणा ई. महत्वपूर्ण विषयावर चर्चा करीत आढावा घेण्यात आला.
यावेळी सर्व विभागांनी समन्वयाने आणि गतिमानपणे काम करत जनतेच्या अडचणी वेळेत सोडवाव्यात असे स्पष्ट निर्देश दिले.या बैठकीस सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.