नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- उपमुख्यमंत्री मा.ना. अजितदादा पवार यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त नशिराबाद राष्ट्रवादी काँग्रेस आणि गोदावरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत महाआरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.नशिराबादमधील उर्दू शाळा क्र. १, नाईकवाडा येथे सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत पार पडलेल्या या शिबिरात एकूण २६३ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये २१८ प्रौढ नागरिकांसह ४५ बालकांचा समावेश होता.
आरोग्य विषयक जनजागृतीचा नवा अध्याय. या आरोग्य शिबिरात हृदयविकार, कर्करोग, रक्तदाब, मधुमेह, मूळव्याध, फिशर, स्त्रीरोग, बालरोग यासारख्या आजारांसह ईसीजी, सोनोग्राफी, फिजिओथेरपी, एंजिओप्लास्टी सल्ला, बायपास तपासणी व रक्ततपासणी यांसारख्या अत्याधुनिक वैद्यकीय सेवा पूर्णतः मोफत देण्यात आल्या.या सेवांसाठी डॉ. उल्लास पाटील धर्मदाय रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक उपस्थित होते. या माध्यमातून आरोग्य विषयक जनजागृतीचा नवा अध्याय नशिराबादमध्ये लिहिला गेला.
प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती
माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष संजय पवार, जिल्हा कार्याध्यक्ष योगेश देसले, वाल्मिक मामा परदेशी, भूषण पाटील, मोनाली पवार, आशाताई माळी आदी मान्यवरांनी शिबिराला सदिच्छा भेट दिली.या उपक्रमाचे आयोजन नशिराबाद राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरप्रमुख गणेश भाऊ चव्हाण आणि सय्यद बरकत अली यांच्या पुढाकारातून करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी खंबीर कार्यकर्त्यांचे योगदान
शेख सांडू, दीपक कोळी, देविदास काकडे, प्रवीण मिस्तरी, प्रशांत कासार, नितीन महाजन, जयेश पाटील, दिलीप मराठे, दुर्गेश होले, किरण नांद्रे, मोहित येवले, महिंद्र मराठे, शुभम जाधव, शेर अली, फरीद खान, अभिषेक माळी, योगेश नेरकर आदींचे योगदान उल्लेखनीय राहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार रंधे सर यांनी केले तर कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन सय्यद बरकत अली यांनी केले.