Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeक्राईमशहापूर हादरले ; परिसर झाला सुन्न... जेवणातून आईने मुलींना विष देवून केली...

शहापूर हादरले ; परिसर झाला सुन्न… जेवणातून आईने मुलींना विष देवून केली हत्या..!

शहापूर (जि. ठाणे) |  प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- तीन मुलींच्या संगोपनाचा ताण सहन न झाल्यामुळं आईनेचं आपल्या पोटच्या तिन्ही अल्पवयीन मुलींना जेवणातून कीटकनाशक औषध दिले. या घटनेने राज्यात खळबळ उडाली. मृत मुलींची नावे काव्या संदीप भेरे (10), दिव्या संदीप भेरे (8) आणि गार्गी संदीप भेरे (5) अशी आहेत.

या तिघींना जेवणातून विषबाधा झाल्याने तिन्ही मुलींची प्रकृती खालावल्याने वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या दोन आणि घोटी येथील एसएमबीटी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले एक अशा तिन्ही मुलींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

आर्थिक अडचणी, मानसिक तणावातून कृत्य पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद झाल्याने संबंधित महिला तिच्या चेरपोली येथील सासरवाडीतून माहेरी अस्नोली येथे परतली होती तसेच आर्थिक अडचणी, मानसिक तणाव आणि जबाबदार्‍यांच्या ओझ्यामुळे ती तणावाखाली होती. याच नैराश्यातून तिने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी किन्हवली पोलीस ठाण्यात आईच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आईला अटक करण्यात आली आहे. दरम्यान या भयानक घटनेने परिसर हादरला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या