नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- न्यू इंग्लिश स्कूल, नशिराबाद येथे आज सकाळी ११.०० ते ११.४० या वेळेत विद्यार्थ्यांसाठी कायदेसाक्षरता आणि सुरक्षिततेसंदर्भातील विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमात नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ए.सी. मनोरे यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत ‘नवीन कायदे’, ‘मोबाईलचा योग्य वापर’, ‘गुड टच आणि बॅड टच’, ‘सायबर गुन्हे’, ‘सोशल मीडियाचा विचारपूर्वक वापर’, ‘डायल 112’, ‘पोलीस काका-पोलीस दीदी योजना’ याबाबत सखोल माहिती दिली.स.पो.नी मनोरे यांनी विद्यार्थ्यांना वाईट सवयींपासून दूर राहण्याचे, गुरुजनांचा आदर करण्याचे, तसेच अल्पवयीन विवाह टाळण्याचे आवाहन केले.तसेच पोलीस हेडकॉन्स्टेबल गुणवंत देशमुख यांनी वाहतूक नियमांची माहिती देत सुरक्षित प्रवासाचे महत्व पटवून दिले.
या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनिता बनसोडे, उपमुख्याध्यापक अनिल चौधरी, सुनील पाचपांडे, जितेंद्र चौधरी, वंदना खासणे, संगीता रत्नपारखी, सुशील झोपे, जितेंद्र महाजन, राहुल जोशी, राजेंद्र पाचपांडे तसेच इतर शिक्षकवर्ग उपस्थित होते.विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस व शाळा प्रशासन यांच्यात समन्वय वाढवण्यावर विशेष भर देण्यात आला. या मार्गदर्शन सत्राला सुमारे ७५० ते ८०० विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.