भुसावळ | प्रतिनिधी | पोलिस दक्षता लाईव्ह :- भारतीय रेल्वेच्या इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी सेवेतील अधिकारी पुनीत अग्रवाल यांनी भुसावळ विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) पदाचा कार्यभार स्वीकारला त्यांनी श्रीमती इती पाण्डेय यांच्याकडून पदभार स्वीकारला.
या पदावर नियुक्त होण्यापूर्वी अधिकारी अग्रवाल नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) येथे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (प्रतिनियुक्त) या पदावर कार्यरत होते.
पुनीत अग्रवाल यांना प्रकल्प व्यवस्थापन आणि विकास, धोरणात्मक व्यवस्थापन, कॉर्पोरेट व्यवहार, मालवाहतूक तसेच लॉजिस्टिक्स, शहरी परिवहन, बहुपक्षीय निधी व्यवस्थापन, उच्च मूल्य खरेदी प्रक्रिया, रेल्वे ऑपरेशन्स, रोलिंग स्टॉक ऑपरेशन्स आणि देखभाल, रेल्वे विद्युतीकरण, हरित ऊर्जा, मानकीकरण आणि गुणवत्ता व्यवस्थापन तसेच कॉर्पोरेट कायदे (करार कायदे, कंपनी कायदे इत्यादी) यामधील व्यापक अनुभव आणि सखोल ज्ञान आहे.
भारतीय रेल्वेमधील उल्लेखनीय सेवेसह, त्यांनी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (DFCCIL) मध्येही विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. प्रकल्प अंमलबजावणीचे नियोजन व वेळापत्रक, साहित्य व्यवस्थापन, देखभाल धोरण, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट (TQM) आणि ISO अंमलबजावणी यामध्येही त्यांचा विशेष अनुभव आहे.
भुसावळ रेल्वे विभागाने अग्रवाल यांचे स्वागत केले आहे. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली विभागात प्रगती, आधुनिकीकरण आणि कार्यक्षमतेत वाढ होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.