Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeक्राईमअश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार ; चौघांविरोधात गुन्हा दाखल

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार ; चौघांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शहरातील महाबळ परिसरात घडलेली अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून, १८ वर्षीय तरुणीवर अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुख्य आरोपीसह चौघांविरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीला आरोपी गणेश साहेबराव पाटील याने १४ सप्टेंबर रोजी बोलण्यात गुंतवून तिच्यावर जबरदस्ती केली. या घटनेचे त्याने फोटो व व्हिडिओ तयार केले. त्यानंतर त्याच माध्यमाचा वापर करून आरोपीने तरुणीला धमकावत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे, गणेश पाटील याने तरुणीला पळवून नेत तिचे आक्षेपार्ह फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड करून तिची बदनामी केली.या संपूर्ण प्रकारात आरोपीला विजय, विकास व मनोज (पूर्ण नावे उपलब्ध नाहीत) या तिघांनी सहकार्य केले असल्याचे पीडितेच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या अत्याचाराला कंटाळून तरुणीने अखेर रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर बुधवार, ३० जुलै रोजी रात्री ७.३० वाजता चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय शेलार करत आहेत.पुढील तपासात आणखी धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून आरोपींच्या अटकेसाठी शोधमोहीम सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या