Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeचाळीसगावचाळीसगाव (उंबरखेड) : दोन तरुण धारदार शस्त्रांसह ताब्यात ; मेहुणबारे पोलिसांची धडाकेबाज...

चाळीसगाव (उंबरखेड) : दोन तरुण धारदार शस्त्रांसह ताब्यात ; मेहुणबारे पोलिसांची धडाकेबाज कारवाई

चाळीसगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेड गावात दोन तरुणांना बेकायदेशीर धारदार शस्त्रांसह मेहुणबारे पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या जनसंपर्क विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही तरुण अवैध शस्त्रांसह गावात दहशत निर्माण करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ कारवाई करत उंबरखेड येथील सुकलाल सुरेश सोनवणे आणि किरण यशवंत सोनवणे (दोघेही रा. उंबरखेड) यांना ताब्यात घेतले.झडतीदरम्यान पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून एक धारदार लोखंडी तलवार आणि कुकरी (धारदार शस्त्र) असा ऐवज जप्त केला. याप्रकरणी संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास मेहुणबारे पोलीस करत आहेत.

या कारवाईमुळे गावात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांच्या तत्परतेमुळे संभाव्य गुन्ह्याला वेळीच आळा बसला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या