नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- महसूल विभागाच्या वतीने सुरु असलेल्या महसूल सप्ताहाच्या चौथ्या दिवशी तरसोद (ता. जळगाव) येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. प्रांत अधिकारी विनय गोसावी व तहसीलदार शितल राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या शिबिरात एकूण ५५३ लाभार्थ्यांना विविध सेवा व लाभ देण्यात आले.
शिबिरात मिळालेल्या सेवांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:-
🔸 उत्पन्न दाखले – ५०
🔸 जिवंत ७/१२ वाटप – ४५ लाभार्थी
🔸 ७/१२ वर नावात दुरुस्ती – २०
🔸 क्षेत्र दुरुस्ती अर्ज (१५५ अंतर्गत) – ५
🔸 पीक पाहणी – ४५
🔸 Agristat नोंदी – १५
🔸 वारस नोंद अर्ज – १०
🔸 सांगायो DBT अर्ज – २०
🔸 आधार नोंदणी – ७५
🔸 आरोग्य तपासणी – ६५
🔸 पोट खराब अर्ज – ३०
🔸 पोस्ट ऑफिस लाभार्थी सेवा – २५
🔸 घरकुल लाभार्थ्यांना ७/१२ वाटप – २३
🔸 कृषी पिक विमा अर्ज प्राप्त – १२५
या शिबिरात मंडळ अधिकारी मिलींद देवरे (नशिराबाद), ग्राम महसूल अधिकारी रुपेश ठाकूर, हेमंत जोशी, आकाश काळे, महसूल सेवक नाना कोळी यांच्यासह गावातील लोकप्रतिनिधी, सरपंच, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वी आयोजनामुळे ग्रामस्थांत समाधान व्यक्त होत आहे.