नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- ताज नगर परिसरातील गटारीच्या तीव्र समस्येमुळे संतप्त नागरिकांनी सोमवार, दिनांक ५ ऑगस्ट रोजी नशिराबाद नगरपरिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. AIMIMच्या नेतृत्वाखाली, सय्यद वासिफ अली यांच्या मार्गदर्शनात हे आंदोलन पार पडले.
ताज नगर परिसरात सांडपाणी रस्त्यावरून वाहत असून, त्यामुळे दुर्गंधीचे आणि आजारांचे मोठे संकट उभे राहिले आहे. शोषखंडे सतत भरून जात असून, लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाकडून यापूर्वीही आश्वासन देण्यात आले होते, मात्र ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.नगरपरिषदेने भूमिगत गटारीसाठी प्रस्ताव तयार केल्याचे सांगितले. त्यामुळे सध्या उघड्या गटारी करता येणार नसल्याचे कारण देण्यात आले. मात्र, “प्रस्ताव मंजूर होईपर्यंत नागरिकांनी रोगराईत जगायचं का?” असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी केला.फक्त गटारीच नव्हे, तर खराब रस्ते व अनियमित पाणीपुरवठा याबाबतही नागरिकांनी संताप व्यक्त करत सेवा समितीच्या निष्क्रियतेवर टीका केली.
मुख्य अधिकारी रवींद्र सोनवणे बैठकीसाठी बाहेरगावी असल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. मात्र कार्यालयीन अधीक्षक पटेल यांनी नागरिकांचे निवेदन स्वीकारले. त्या वेळीं बांधकाम अभियंता तोष्णीवालही त्याच्या सोबत होते.या आंदोलनात महिला, पुरुष, तरुण अशा अंदाजे १५० नागरिकांनी सहभाग घेतला होता. “नगरपरिषद मुर्दाबाद” च्या जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.