Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeएरंडोलकासोदा पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा ; १५ जण ताब्यात, लाखो रुपयांचा मुद्देमाल...

कासोदा पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा ; १५ जण ताब्यात, लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. !

एरंडोल | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- तालुक्यातील जवखेडे सिम गावात गालापूर रोडलगत काटेरी झुडपांच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कासोदा पोलिसांनी धडक कारवाई करत १५ जुगारींना ताब्यात घेतले. या कारवाईत १ लाख २१ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश दिवानसिंग राजपूत यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पो.ना. प्रदीप पाटील, पोकॉ. समाधान तोंडे, पोकॉ. निलेश नाना गायकवाड व पोकॉ. योगेश पाटील यांच्या पथकाने घटनास्थळी सापळा रचला. वाहने दूर ठेवून पायी कारवाई करताना दुपारी साडेतीनच्या सुमारास पत्त्यांचा डाव रंगत असतानाच पोलिसांनी धाड टाकली.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये सोनू धाकु भिल (५०), विरभान श्रावण भिल (४०), राहुल संतोष सोनवणे (२६), प्रवीण वसंत सोनवणे (३९), संतोष माधव सोनवणे (३०), सुनील दगा ठाकरे (३५), मंगिलाल भाईदास चव्हाण (४५), रतन धाकु भिल (६०), अशोक गोविंदा पाटील (५४), सचिन बापू पवार (३७), कांतीलाल महादू सोनवणे (३८), उत्तम बालाअप्पा जेढे (५०), समाधान बापू पाटील (३५), संभाजी महारु पाटील (५८) आणि सुनील सीताराम वाघ (४८) यांचा समावेश आहे. सर्व आरोपी जवखेडे सिम (ता. एरंडोल) येथील रहिवासी आहेत.

कारवाईदरम्यान आरोपींकडून ६ हजार ३९० रुपये रोख व १ लाख १५ हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली असा एकूण १ लाख २१ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोकॉ. ५०१ दीपक देसले यांच्या फिर्यादीवरून कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या