Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगावहतनूर धरणावर तिरंगा स्वरूपातील विद्युत रोषणाई ; अतिशय मनोहारी दृश्य...!

हतनूर धरणावर तिरंगा स्वरूपातील विद्युत रोषणाई ; अतिशय मनोहारी दृश्य…!

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- ‘हर घर तिरंगा’ जनजागृती पंधरवड्यानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या निर्देशांनुसार हतनूर धरणावर तिरंगा स्वरूपातील भव्य रोषणाई करण्यात आली आहे.अतिशय मनोहारी दृश्य पाहून सर्वांना खूप आनंद होत आहे.२ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत हतनूर धरण राष्ट्रीय ध्वजाच्या तिन्ही रंगांतील प्रकाशाने उजळून निघणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना वाढवणे आणि राष्ट्रीय ध्वजाबाबतचा अभिमान व्यक्त करणे हा आहे. धरण परिसरात सायंकाळी अंधार पडल्यानंतर सुरू होणारी ही प्रकाशमालिका पर्यटकांचे व स्थानिक नागरिकांचे विशेष आकर्षण ठरत आहे.

जलसंपदा विभागाच्या या अभिनव उपक्रमामुळे हतनूर धरण हे केवळ जलस्रोत न राहता देशप्रेमाचा उजळ प्रतीक ठरत आहे. या प्रकाशोत्सवाचा पर्यटक, स्थानिक नागरिक आणि प्रसारमाध्यमांनी नक्कीच अनुभव घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. हा प्रकाशमहोत्सव १५ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.हतनूर प्रकल्पात ५१.९३% पाणीसाठा; पाण्याचा विसर्ग सुरु गेल्या काही दिवसांपासून पावसाची उघडझाप सुरू असतानाही हतनूर प्रकल्पातील साठ्यात वाढ झाली आहे. काल सकाळी ९ वाजता नोंदवलेली पाण्याची पातळी २१०.१५० मीटर आहे. ही पातळी प्रकल्पाच्या पूर्ण जलाशय पातळीपेक्षा (२१४.००० मीटर) थोडी खाली आहे. सध्या प्रकल्पात एकूण ५१.९३ टक्के म्हणजेच २०१.५० दशलक्ष घनमीटर (मिमी) पाणीसाठा आहे.

त्यापैकी लाईव्ह स्टोरेज ६८.५० मिमीन असून, हे साठा २६.८६ टक्के इतका आहे. पाण्याचा विसर्ग सुरक्षीत रितीने सुरू आहे. रेडियल गेट क्रमांक २ हाफ मीटरने उघडण्यात आला आहे. या गेटमधून ५७क्युमेक (क्यूबिक मीटर प्रति सेकंद) वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.कालव्यांमधून २.८३ क्युमेक (१०० क्युसेक) खाय सुरु असून, आर. एस. गेटमधून कोणताही विसर्ग नाही. आज प्रकल्प क्षेत्रात पावसाची नोंद झाली नाही. मात्र, आतापर्यंतच्या हंगामात २५९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या