भुसावळ | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:- झेड. पी. शाळा, खडका येथील निवृत्त व ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती शालिनी जगन्नाथ पाटील यांचे दिनांक २५ जुलै २०२५ रोजी वार्धक्याने निधन झाले. त्या वयाच्या __७८_ वर्षांच्या होत्या. शैक्षणिक क्षेत्रातील एक निष्ठावान व आदर्श व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
श्रीमती पाटील यांनी आपल्या दीर्घ कार्यकाळात अनेक विद्यार्थ्यांचे जीवन घडविण्यासाठी अथक परिश्रम घेतले. कार्यतत्परता, साधेपणा, विद्यार्थ्यांवरील प्रेम आणि शैक्षणिक कार्यातील निष्ठा यामुळे त्या सर्वांच्या आदरास पात्र ठरल्या होत्या.
मागे पती श्री. जगन्नाथ पाटील, सुन सौ. सुरेखा मनोज पाटील, सौ. वृषाली प्रविण पाटील, कन्या सौ. संगिता अजय चौधरी, मोहिनी सरोदे,सुलभा बोंडे,सून अर्चना अनिल इंगळे,
जाऊ मंगलl सोपान पाटील, सून एकता सचिन पाटील तसेच नातवंडे कौस्तुभ, रियान्श, मयंक आणि वैश्णवी असा परिवार आहे.
अंत्यसंस्कार भुसावळ गावातील स्मशानभूमीत नातेवाईक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडले.