जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक वुईके यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.या बैठकीमध्ये भारतीय जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान योजना, वन हक्क दावे, वन अतिक्रमण आणि इतर अनुषंगिक विषय, आदिवासी विकास महामंडळ तसेच शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ यांच्या सर्वसाधारण तसेच वैयक्तिक लाभांच्या योजनांचा आढावा घेण्यात आला.
मुक्ताईनगर मतदारसंघातील आदिवासी बांधवांच्या सोयीसाठी गावावरच किंवा वाड्यावर शिबिर घेऊन जातीचे प्रमाणपत्र वाटप करण्याबाबत मंत्रिमहोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या.
तसेच मुक्ताईनगर मतदारसंघातील कुऱ्हा भागातील जोंधणखेडा, लालगोटा, हलखेडा, मधापुरी इत्यादी गावे १०० टक्के आदिवासी असूनही आदिवासी बाह्य क्षेत्रमध्ये आहेत.या गावांना १०० टक्के आदिवासी घोषित करून सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळावा,यासाठी मा.आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक वुईके यांना ठोस मागणी सादर केली.
याप्रसंगी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री खासदार रक्षाताई खडसे, वस्त्रोद्योग राज्यमंत्री संजय सावकारे,आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल कारनवाल तसेच आदिवासी अधिकारी उपस्थित होते.