जळगाव | प्रतिनिधी | पोलिस दक्षता लाईव्ह:- कट्टा सखी सुगरण ग्रुपतर्फे यंदाही एसटी बस डेपोमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. गेल्या पाच वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबवला जात आहे. या वर्षीही ग्रुपमधील सर्व मैत्रिणींनी एसटी कर्मचाऱ्यांचे औक्षण करून राख्या बांधल्या तसेच भेटवस्तू देऊन सर्व भावांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी मंडळाच्या अध्यक्षा शैला चौधरी म्हणाल्या, “जे भाऊ बहिणींना राखी बांधण्यासाठी बसने भावा कडे किंवा भावाला बहीणीकडे पोहोचवतात, ते कर्मचारी या सणापासून वंचित राहू नयेत, म्हणून आम्ही हा कार्यक्रम आयोजित करतो.” तसेच त्यांनी एसटी महामंडळाच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या आणि उपस्थितांचे आभार मानले.
या सोहळ्यात शैला चौधरी, दीपाली कुलकर्णी, शुभांगी चौधरी, सरला वाणी, उल्का पाटे, वैशाली शिरोळे, माधुरी जावळे, मिताली इंगळे, भारती चौधरी, वैशाली शिरोडे, वैशाली गुरव, मनिषा ठाकूर, पुनम जोशी, दीपाली महाजन आणि सविता जाधव यांची उपस्थित होते.