जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव सुवर्णनगरीत दिनांक ४ ऑक्टोबर २०२५ ते १० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत शिवमहापुराण कथेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हे आयोजन नवीन तरसोद-असोदा बायपास हायवेवरील दूरदर्शन टॉवरजवळ पार पडणार आहे.
या संदर्भात, दिनांक ७ ऑगस्ट २०२५ रोजी गुरुवारी सकाळी कुंदकेश्वर शिवमहापुराण कथा सेवा समितीच्या प्रमुख आयोजिका सौ. ममता ताई श्रीकांत बोढरे यांनी जळगावचे आमदार मा. सुरेश दामू भोळे (उर्फ राजू मामा) यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. ४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या कथेचे वाचन आंतरराष्ट्रीय प्रवक्ता, भागवत भूषण पुरस्कार सन्मानित पंडित प्रदीपजी मिश्रा गुरुदेव (सिहोर वाले) करणार असून, संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि सहकार्याची जबाबदारी स्वीकारण्याचे आश्वासन मा. आमदार सुरेश भोळे यांनी दिले.
या भेटीत जळगाव शिवमहापुराण कथा आयोजक सौ. ममता ताई श्रीकांत बोढरे माळी, गणेश महाजन, नाना बारी, सुरेश वाघ, प्रविण पाटील तथा संगीता महाजन उपस्थित होते.